तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने CRP CSA-XVI (Customer Service Associate) भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे देशभरातील विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये Customer Service Associate (Clerk पद) भरले जाणार आहेत. IBPS ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी भरती प्रक्रिया राबवणारी संस्था आहे. या परीक्षेसाठी दरवर्षी लाखो उमेदवार अर्ज करतात. यंदाही मोठ्या प्रमाणात रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
पदवीधर उमेदवारांसाठी ही भरती म्हणजे अत्यंत उत्तम संधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना भारतातील सहभागी बँकांमध्ये नियुक्ती दिली जाईल. या लेखात आपण भरतीची संपूर्ण माहिती, महत्त्वाच्या तारखा, पदांचा तपशील, पात्रता, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम आणि अर्ज करण्याची पद्धत सोप्या शब्दात जाणून घेऊया.
मूलभूत माहिती
| घटक | माहिती |
|---|---|
| भरती संस्था | Institute of Banking Personnel Selection (IBPS) |
| भरतीचे नाव | CRP CSA-XVI Recruitment 2026 |
| पदाचे नाव | Customer Service Associate (CSA) |
| पूर्वीचे पदनाम | Clerk |
| एकूण जागा | 11,403 |
| नोकरीचा प्रकार | केंद्र सरकार अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँका |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| परीक्षा | Preliminary आणि Main Examination |
| अधिकृत संकेतस्थळ | https://www.ibps.in/ |

महत्त्वाच्या तारखा
भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी खालील महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा.
- ऑनलाइन अर्ज सुरू: 01 ऑगस्ट 2026
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 21 ऑगस्ट 2026
- अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 21 ऑगस्ट 2026
- Preliminary परीक्षा: ऑक्टोबर 2026
- Preliminary निकाल: ऑक्टोबर / नोव्हेंबर 2026
- Main परीक्षा: नोव्हेंबर 2026
- तात्पुरती नियुक्ती (Provisional Allotment): मार्च 2027
टीप: तारखांमध्ये काही बदल झाल्यास उमेदवारांनी वेळोवेळी IBPS च्या अधिकृत संकेतस्थळाला (Official Site) भेट देऊन खात्री करावी.
पदांचा तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| लिपिक (Clerk – CRP Clerk-XIV) | 11403 |
| एकूण | 11403 |
या भरतीमध्ये देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये Customer Service Associate (CSA) पदासाठी भरती केली जाणार आहे. पूर्वी हे पद IBPS Clerk या नावाने ओळखले जात होते. यावर्षी देशभरात 11,403 रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत.
राज्यानुसार रिक्त पदांची संख्या वेगवेगळी आहे. त्यामुळे तुम्ही (उमेदवारांनी) अर्ज करताना संबंधित राज्य आणि बँकेसाठी उपलब्ध रिक्त पदांची अधिकृत संकेतस्थळाला (Official Site) भेट देऊन खात्री करावी.
महाराष्ट्रातील रिक्त पदे (Maharashtra Vacancy): महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे, कारण महाराष्ट्रासाठी एकूण 1,051 पदे जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातून अर्ज करणाऱ्या आणि मराठी भाषा येणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे
Customer Service Associate (CSA) चे काम काय असते?
Customer Service Associate हा बँकेच्या दैनंदिन कामकाजातील महत्त्वाचा कर्मचारी असतो. बँकेत येणाऱ्या ग्राहकांशी त्याचा थेट संबंध येतो. त्याच्या मुख्य जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे असतात:
- ग्राहकांना नवीन खाते उघडण्यास मदत करणे आणि त्यांच्या शंकांचे निरसन करणे.
- ग्राहकांकडून रोख रक्कम (Cash) जमा करून घेणे आणि पैसे काढण्याची प्रक्रिया हाताळणे.
- धनादेश (Cheque) स्वीकारणे, त्यांची पडताळणी करणे आणि ते पास करणे.
- ग्राहकांची पासबुक अपडेट करणे आणि खात्याचे स्टेटमेंट देणे.
- डिजिटल बँकिंग मार्गदर्शन: NEFT, RTGS, IMPS आणि मोबाईल बँकिंग सेवांबद्दल बँकेचे दैनंदिन रेकॉर्ड्स, सरकारी योजनांचे फॉर्म्स आणि इतर कागदपत्रे व्यवस्थित ठेवणे.
या पदावर काम करताना ग्राहकांशी उत्तम संवाद साधण्याची कला (Communication Skills), संगणकाचे मूलभूत ज्ञान आणि बँकिंग प्रक्रियेची प्राथमिक समज असणे आवश्यक असते.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
IBPS CSA (Customer Service Associate) भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिसूचनेत नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी या अटी काळजीपूर्वक तपासणे महत्त्वाचे आहे.
शैक्षणिक पात्रता
IBPS CSA 2026 भरतीसाठी तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) पूर्ण केलेली असावी. तसेच तुमच्याकडे 21ऑगस्ट 2026 पर्यंत पदवीचे प्रमाणपत्र किंवा पदवी उत्तीर्ण झाल्याचा वैध पुरावा असणे आवश्यक आहे.
याशिवाय खालील पात्रताही असणे गरजेचे आहे.
- संगणकाचे मूलभूत ज्ञान असावे.
- संगणक विषयाचे प्रमाणपत्र, डिप्लोमा किंवा पदवी असल्यास ते ग्राह्य धरले जाईल.
- शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणात संगणक विषयाचा अभ्यास केलेला असल्यासही ही अट पूर्ण मानली जाईल.
- ज्या राज्यासाठी अर्ज केला आहे त्या राज्याच्या स्थानिक भाषेचे वाचन, लेखन आणि बोलण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
स्थानिक भाषेचे ज्ञान का आवश्यक आहे?
IBPS CSA पदावर काम करताना तुम्हाला ग्राहकांशी थेट संवाद साधावा लागतो. त्यामुळे संबंधित राज्यातील स्थानिक भाषा येणे आवश्यक असते.
उदाहरणार्थ, महाराष्ट्रासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आवश्यक असल्यास IBPS किंवा संबंधित बँकेकडून Local Language Proficiency Test (LLPT) घेतली जाऊ शकते. मात्र उमेदवाराने दहावी किंवा बारावीमध्ये संबंधित स्थानिक भाषा विषय म्हणून शिकलेली असल्यास, सामान्यतः स्वतंत्र भाषा चाचणीतून सूट मिळू शकते.
वयोमर्यादा (Age Limit – 01 ऑगस्ट 2026 रोजी)
IBPS CSA पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवाराचा जन्म 2 ऑगस्ट 1998 ते 1 ऑगस्ट 2006 च्या दरम्यान झालेला असावा.
शासकीय नियमांनुसार वयातील सूट:
- OBC (Non-Creamy Layer): 3 वर्षे सूट (कमाल वय 31 वर्षे)
- SC / ST: 5 वर्षे सूट (कमाल वय 33 वर्षे)
- PwBD (दिव्यांग उमेदवार): 10 वर्षे सूट
निवड प्रक्रिया (Selection Process)IBPS CSA
भरतीची निवड प्रक्रिया अतिशय पारदर्शक असून ती प्रामुख्याने दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाते.
1. पूर्व परीक्षा (Preliminary Examination)
- ही पहिली ऑनलाईन परीक्षा असून ती केवळ पात्रता (Qualifying) परीक्षा असते.
- यामध्ये एकूण 100 गुणांचे वस्तुनिष्ठ (MCQs) प्रश्न विचारले जातात.
- विषय: इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता (Maths), आणि तर्कशक्ती (Reasoning).
- या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवले जाते.
- नकारात्मक गुण (Negative Marking): प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25(1/4) गुण वजा केले जातात.
2. मुख्य परीक्षा (Main Examination)
- पूर्व परीक्षेतून निवडलेले उमेदवार ही ऑनलाईन परीक्षा देऊ शकतात.
- विषय: सामान्य/वित्तीय जाणीव (General/Financial Awareness), इंग्रजी, रिझनिंग व कॉम्प्युटर, आणि संख्यात्मक क्षमता.
- अंतिम निवड: उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी (Merit List) केवळ या मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार केली जाते.
- यामध्येही चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांची निगेटिव्ह मार्किंग असते.
3. स्थानिक भाषा प्राविण्य चाचणी (Local Language Proficiency Test – LLPT)
- मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराची स्थानिक भाषेची (उदा. महाराष्ट्रासाठी मराठी) चाचणी घेतली जाते.
- सूट: ज्या उमेदवारांनी आपल्या 10 वी किंवा 12 वीच्या गुणपत्रकेमध्ये ‘मराठी’ विषय शिकल्याचा पुरावा सादर केला आहे, त्यांना ही चाचणी देण्याची गरज नसते.
- उमेदवारांना मराठी बोलणे, लिहिणे आणि वाचणे येते की नाही, हे तपासण्यासाठी ही प्राथमिक चाचणी घेतली जाते.
4. अंतिम नियुक्ती (Final Allotment)
मुख्य परीक्षेचे गुण आणि भाषा चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार (Merit) त्यांनी निवडलेल्या बँकांमध्ये तात्पुरती नियुक्ती (Provisional Allotment) दिली जाते.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
ऑनलाइन अर्ज करताना आणि कागदपत्र पडताळणी (Document Verification) वेळी खालील कागदपत्रे आवश्यक असतात. फॉर्म भरण्यापूर्वी या गोष्टी स्कॅन करून तयार ठेवाव्यात:
- ओळख आणि जन्मतारखेचा पुरावा: दहावीचे गुणपत्रक/प्रमाणपत्र किंवा जन्मतारखेचा दाखला, तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र.
- शैक्षणिक कागदपत्रे: पदवीचे (Graduation) प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक.
- संगणक प्रमाणपत्र: संगणक शिक्षणाचे प्रमाणपत्र/डिप्लोमा (किंमा शाळा/कॉलेजमध्ये संगणक विषय असल्याचा पुरावा).
- आरक्षण प्रमाणपत्र (लागू असल्यास): जात प्रमाणपत्र (Caste Certificate), नॉन-क्रिमिलेअर (OBC साठी), EWS प्रमाणपत्र किंवा दिव्यांग (PwBD) प्रमाणपत्र.
- माजी सैनिक प्रमाणपत्र: लागू असल्यास डिस्चार्ज बुक किंवा संबंधित प्रमाणपत्र.
ऑनलाईन अपलोड करायचे
- पासपोर्ट आकाराचा फोटो: अलीकडील रंगीत फोटो (पार्श्वभूमी पांढरी असावी).
- उमेदवाराची स्वाक्षरी: पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने (Black Ink) केलेली स्वाक्षरी (कॅपिटल अक्षरात स्वाक्षरी करू नये).
- डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा: पांढऱ्या कागदावर निळ्या किंवा काळ्या शाईने उमटवलेला ठसा.
- हस्तलिखित घोषणापत्र (Handwritten Declaration): उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने खालील मजकूर इंग्रजीत लिहिणे अनिवार्य आहे.
घोषणापत्राचा अधिकृत मजकूर (Text):“I, __(Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
महत्त्वाची टीप: सर्व कागदपत्रे अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या फाईल साईज (Size) आणि फॉरमॅटनुसार (JPEG/JPG) स्कॅन करावीत. स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा अस्पष्ट असल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
अभ्यासक्रम (Syllabus)
IBPS CSA भरती अंतर्गत पूर्व (Preliminary) आणि मुख्य (Main) अशा दोन टप्प्यांत ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. दोन्ही परीक्षांचा संक्षिप्त अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे:
1. पूर्व परीक्षा अभ्यासक्रम (Preliminary Exam Syllabus)
पूर्व परीक्षेत एकूण 100 गुणांसाठी 3 विषय असतात. त्याचे मुख्य घटक खालीलप्रमाणे:
इंग्रजी भाषा (English Language):
- व्याकरण आणि आकलन (Grammar & Reading Comprehension)
- वाक्य सुधारणा आणि रिकाम्या जागा भरणे (Error Detection & Fill in the Blanks)
तर्कशक्ती (Reasoning Ability):
- कोडी आणि बैठक व्यवस्था (Puzzles & Seating Arrangement)
- कोडिंग-डिकोडिंग आणि नातेसंबंध (Coding-Decoding & Blood Relations)
संख्यात्मक क्षमता (Numerical Ability – Maths):
- सरलीकरण आणि संख्या मालिका (Simplification & Number Series)
- डेटा इंटरप्रिटेशन आणि मूलभूत अंकगणित (Data Interpretation & Arithmetic)
2. मुख्य परीक्षा अभ्यासक्रम (Main Exam Syllabus)
मुख्य परीक्षेत 200 गुणांसाठी खालील 4 विभागांचा समावेश होतो:
सामान्य / वित्तीय जाणीव (General / Financial Awareness):
- चालू घडामोडी आणि सरकारी योजना (Current Affairs & Govt Schemes)
- बँकिंग व्यवस्था, आरबीआय (RBI) आणि आर्थिक संज्ञा (Banking Terms)
सामान्य इंग्रजी (General English):
- प्रगत वाचन आकलन (Advanced Reading Comprehension)
- शब्दसंग्रह आणि वाक्यरचना सुधारणा (Vocabulary & Sentence Rearrangement)
तर्कशक्ती आणि संगणक ज्ञान (Reasoning & Computer Aptitude):
- उच्च पातळीवरील कोडी आणि लॉजिकल रिझनिंग (High-Level Puzzles)
- संगणकाची मूलभूत माहिती, इंटरनेट आणि नेटवर्किंग (Computer Fundamentals & Internet)
संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude):
- प्रगत डेटा इंटरप्रिटेशन (Advanced DI & Data Analysis)
- नफा-तोटा, टक्केवारी, काळ-काम-वेग (Profit, Loss, Percentage & Time-Work)
IBPS CSA परीक्षा मराठी भाषेत देता येते का?
होय. तुम्ही मराठी भाषेत परीक्षा देऊ शकता.
IBPS CSA Preliminary आणि Main परीक्षेतील Reasoning Ability, Quantitative Aptitude, General Awareness आणि Computer Aptitude या विषयांचे प्रश्न मराठी भाषेत सोडवण्याचा पर्याय उपलब्ध असतो. तुम्ही प्रश्नपत्रिका English किंवा Marathi भाषेत पाहू शकतात. मात्र English Language हा विषय फक्त इंग्रजी भाषेतच असतो. या विभागासाठी स्वतंत्रपणे इंग्रजीची तयारी करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. काही उमेदवारांना आवश्यक असल्यास Local Language Proficiency Test (LLPT) द्यावी लागू शकते. मात्र दहावी किंवा बारावीमध्ये मराठी विषय शिकलेला असल्यास, साधारणपणे स्वतंत्र भाषा चाचणीची आवश्यकता राहत नाही.
अर्ज कसा करावा? (How to Apply)
IBPS CSA भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. उमेदवार खालील मुद्द्यांनुसार आपला अर्ज सादर करू शकतात:
- अधिकृत संकेतस्थळ: सर्वात आधी आयबीपीएसच्या www.ibps.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- भरती लिंक: होमपेजवर असणाऱ्या “CRP Clerical / CRP CSA-XVI 2026” या पर्यायावर क्लिक करा.
- नवीन नोंदणी: सर्वात आधी “Click here for New Registration” निवडून आपले नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून नोंदणी करा.
- लॉगिन प्रक्रिया: नोंदणी पूर्ण झाल्यावर मोबाईलवर आलेले Registration Number आणि Password वापरून अकाउंट लॉगिन करा.
- माहिती भरणे: अर्जामध्ये आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि बँकेचा प्राधान्यक्रम (Bank Preference) अचूक भरा. पुन्हा खात्री करून घ्या कि आपण भरलेली माहिती बरोबर आहे का.
- परीक्षेचे माध्यम: महाराष्ट्रातील उमेदवारांनी प्रश्नपत्रिका मराठीत मिळण्यासाठी ‘मराठी’ (Marathi) हे माध्यम काळजीपूर्वक निवडावे.
- कागदपत्रे अपलोड: अधिसूचनेत दिलेल्या आकारात आपला फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज शुल्क: आपल्या प्रवर्गासाठी (Category) लागू असलेले परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने (नेट बँकिंग/कार्ड द्वारे) भरा.
- अर्ज तपासणी: फॉर्म सबमिट करण्यापूर्वी भरलेली सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक तपासा.
- अंतिम सबमिशन: सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावर Submit बटणावर क्लिक करा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची व फी पावतीची प्रिंट आउट काढून सुरक्षित ठेवा.
महत्त्वाच्या लिंक
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत PDF | येथे क्लिक करा |
महत्त्वाच्या सूचना (Important Points)
- अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- अर्जामधील सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा, चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
- फॉर्ममध्ये स्वतःचा चालू मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी भरा, जेणेकरून पुढील सर्व माहिती वेळेवर मिळेल.
- फोटो, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र स्पष्ट आणि दिलेल्या आकारातच अपलोड करा.
- शेवटच्या दिवशी कधी सर्व्हर डाऊन असतो त्यामुळे या समस्येपासून वाचण्यासाठी 21 ऑगस्ट 2026 पूर्वीच अर्ज पूर्ण करा.
- नोंदणी झाल्यानंतर मिळालेला Registration Number आणि Password सुरक्षित लिहून ठेवा.
- अर्ज यशस्वीरित्या सादर केल्यानंतर मुख्य फॉर्म आणि फी भरल्याची पावती यांची प्रिंट काढून सुरक्षित ठेवा.
- परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) अधिकृत संकेतस्थळावरून वेळेवर डाउनलोड करा.
- परीक्षा केंद्रावर जाताना हॉल तिकीटसोबत एक वैध मूळ फोटो, ओळखपत्र आणि त्याची झेरॉक्स प्रत सोबत घेऊन जा.
- परीक्षेचे वेळापत्रक आणि इतर नवीन बदलांसाठी नियमितपणे IBPS च्या अधिकृत वेबसाईटला भेट देत राहा.
- उमेदवारांची अंतिम निवड मुख्य परीक्षेचे गुण आणि IBPS च्या नियमांनुसार केली जाईल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
IBPS CSA म्हणजे काय?
IBPS CSA (Customer Service Associate) ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील ग्राहक सेवा संबंधित पदासाठी घेतली जाणारी भरती परीक्षा आहे. पूर्वी हे पद ‘IBPS Clerk’ या नावाने ओळखले जात होते.
IBPS CSA भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) पूर्ण केलेली असावी.
IBPS CSA परीक्षेसाठी वयोमर्यादा किती आहे?
उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाते.
IBPS CSA परीक्षा मराठी भाषेत देता येते का?
होय. महाराष्ट्रातील उमेदवारांना इंग्रजी वगळता इतर विभागांचे प्रश्न मराठी भाषेत सोडवण्याचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र, English Language विभाग फक्त इंग्रजीमध्येच असतो.
निवड प्रक्रिया कशी असते?
निवड प्रक्रिया मुख्यतः पूर्व परीक्षा (Preliminary Examination), मुख्य परीक्षा (Main Examination) आणि आवश्यक असल्यास स्थानिक भाषा चाचणी (LLPT) या टप्प्यांवर आधारित असते.
अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे?
उमेदवारांनी अर्ज केवळ IBPS च्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
महाराष्ट्रासाठी स्थानिक भाषा कोणती आहे?
महाराष्ट्रासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी भाषेचे वाचन, लेखन आणि बोलण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
IBPS CSA भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का?
होय. पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 (1/4) गुण वजा केले जातात.
निष्कर्ष (Conclusion)
IBPS CSA (Customer Service Associate) भरती 2026 ही बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. चांगला पगार, नोकरीची स्थिरता, बढतीच्या संधी आणि देशातील नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये काम करण्याची संधी या भरतीमुळे मिळू शकते. जर तुम्हाला अर्ज करण्यास काही अथला येत असेल तर तुम्ही एखाद्या कॅफेटेरिया (cafeteria ) मध्ये जाऊन सुद्धा भरू शकता. त्यामुळे तुम्हाला अर्ज करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही.
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत आणि आवश्यक कागदपत्रांची खात्री करूनच अर्ज करा. वेळेवर आणि योग्य दिशेने तयारी सुरू केल्यास या परीक्षेत यश मिळवण्याची शक्यता अधिक वाढते.
डिस्क्लेमर (Disclaimer)
या लेखामधील माहिती केवळ सामान्य माहितीसाठी (Informational Purposes) देण्यात आली आहे. माहिती अचूक ठेवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे. तरीही अर्ज करण्यापूर्वी IBPS च्या अधिकृत अधिसूचनेतील सर्व अटी, नियम आणि पात्रता निकष काळजीपूर्वक तपासावेत. अधिकृत अधिसूचनेतील माहिती अंतिम आणि ग्राह्य मानली जाईल.
अशाच नवीन नोकरीच्या भरती आणि करिअर अपडेट्ससाठी JobDukan वेबसाइटला नियमित भेट देत रहा.