Union Bank of India Bharti 2026- Apply Now

युनियन बँक(Union Bank) ऑफ इंडिया भरती 2026: मॅनेजर, सीनियर मॅनेजर, चीफ मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर आणि डेप्युटी जनरल मॅनेजर अशा विविध पदांसाठी एकूण 395 रिक्त जागांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2026 ची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी युनियन बँक ऑफ इंडियाने भरती प्रकल्प 2026-27 (Recruitment Project 2026-27) अंतर्गत विविध अधिकारी (Officer) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. युनियन बँक ऑफ इंडिया ही भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून उमेदवारांना आकर्षक वेतन, विविध भत्ते आणि उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध करून देते. या भरतीद्वारे एकूण 385 रिक्त पदे भरली जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ पदांचा समावेश आहे.

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत यांची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार पात्र उमेदवार निश्चित कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या लेखामध्ये युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2026 संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, पदनिहाय रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत तसेच अधिकृत अधिसूचना आणि अर्जाची लिंक याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी हा लेख संपूर्ण वाचा आणि त्यानंतर अधिकृत अधिसूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करा.

मूलभूत माहिती

बाबीमाहिती
बँकेचे नावयुनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India)
पदाचे नावव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, उप-महाव्यवस्थापक
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
एकूण जागा395
अर्जाची सुरुवात21 जुलै 2026
अर्जाची अंतिम तारीख10 ऑगस्ट 2026
अर्ज प्रिंट करण्याची अंतिम तारीख25 ऑगस्ट 2026
अर्ज पद्धतऑनलाईन (Online)
अर्ज शुल्क (Fees)General/OBC: ₹1180
SC/ST/PWD: ₹177/
युनियन बँक(Union Bank) ऑफ इंडिया भरती 2026

महत्त्वाच्या तारखा

  • अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध: 21 जुलै 2026
  • ऑनलाइन अर्ज सुरू: 21 जुलै 2026
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 ऑगस्ट 2026 (रात्री 11:59 पर्यंत)
  • अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 10 ऑगस्ट 2026
  • ऑनलाइन परीक्षेची तारीख (अंदाजित): नंतर जाहीर करण्यात येईल
  • मुलाखतीची तारीख: ऑनलाइन परीक्षा/समूह चर्चेच्या निकालानंतर जाहीर करण्यात येईल
  • प्रवेशपत्र (Admit Card): ऑनलाइन परीक्षेपूर्वी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल.

पदांचा तपशील

पदाचे नावस्केल/ग्रेडपद संख्याCTC (अंदाजे)
लाखांमध्ये
मॅनेजरMMGS-II16321
सिनियर मॅनेजरMMGS-III15325
चीफ मॅनेजरSMGS-IV 525230
असिस्टंट जनरल मॅनेजरSMGS-V2038
डेप्युटी जनरल मॅनेजरTEGS-VI0747
एकूण395

हि जी सर्व पदे आहेत त्यामध्येच विविध पदांचा समावेश आहे . म्हणजे scale II मध्ये AML Specialist , Financial Crimes Investigator, etc. , scale III मध्ये Certified Fraud Examiner , Project Management Professional, etc. असेच scale IV, scale V, scale VI यामध्येही वेगवेगळी पदे आहेत ज्यामध्ये तुम्ही apply करू शकता . तुम्ही अधिकृत वेबसाइट वर बघू शकता कोणती पदे आहेत ते .

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2026 अंतर्गत विविध अधिकारी पदांसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील Graduation, Post Graduation, B.E./B.Tech, MBA, CA, ICWA किंवा पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असायला हवी.

या भरतीमध्ये Manager, Senior Manager, Chief Manager, Assistant General Manager आणि Deputy General Manager अशा Specialist Officer पदांचा समावेश आहे. मी आधी वर सांगितल्या प्रमाणे, कि हि मुख्य पदे दिली आहेत, पण या पदांमध्येच दुसऱ्या पदांचा समावेश आहे. जो तुम्ही ‘युनियन बँक ऑफ इंडिया ‘ च्या अधिकृत वेबसाइट वर बघू शकता. त्यामुळे प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव (Work Experience) अधिकृत अधिसूचनेनुसार असणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदाची शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची अट अधिकृत अधिसूचनेतून तपासून घ्या.

वयोमर्यादा (Age Limit)

अधिकृत अधिसूचनेनुसार 1 जुलै 2026 रोजी तुमचे वय संबंधित पदानुसार निश्चित केलेल्या मर्यादेत असणे आवश्यक आहे.

किमान वय: 22 ते 25 वर्षे (पदानुसार)
कमाल वय: 30, 35, 40, 45 किंवा 50 वर्षे (संबंधित पदानुसार)

वयोमर्यादेत सूट (Age Relaxation)

सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना पुढीलप्रमाणे वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल.

  • SC/ST: 5 वर्षे
  • OBC (Non-Creamy Layer): 3 वर्षे
  • PwBD (दिव्यांग): 10 वर्षे
  • Ex-Servicemen (माजी सैनिक): 5 वर्षे

टीप: प्रत्येक पदासाठी किमान व कमाल वयोमर्यादा वेगवेगळी असल्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाची वयोमर्यादा अधिकृत अधिसूचनेतून एकदा तपासून घ्यावी.

निवड प्रक्रिया (Selection Process)

1. अर्जांची छाननी (Application Screening)

ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि कामाचा अनुभव याची पडताळणी केली जाईल. एखाद्या पदासाठी अर्जांची संख्या जास्त असल्यास पात्रता आणि अनुभवाच्या आधारे तुम्हाला पुढील टप्प्यासाठी शॉर्टलिस्ट केले जाऊ शकते.

2. ऑनलाइन परीक्षा (Online Examination)

आवश्यकतेनुसार बँकेकडून ऑनलाइन परीक्षा आयोजित केली जाईल. पदानुसार परीक्षेचे स्वरूप वेगळे असू शकते.

Specialist Officer (Post Code S01 ते S108)

Professional Knowledge विषयावर परीक्षा घेतली जाईल.

  • प्रश्नांची संख्या: 50
  • एकूण गुण: 100
  • कालावधी: 60 मिनिटे

General Posts (Post Code G01 ते G19)

  • एकूण प्रश्न: 125
  • एकूण गुण: 175
  • कालावधी: 120 मिनिटे

या परीक्षेत Quantitative Aptitude, Reasoning आणि English हे विषय पात्रतेसाठी (Qualifying) असतील, तर अंतिम गुणवत्ता यादीसाठी Professional Knowledge या विषयातील गुणांचा विचार केला जाईल. नेगेटिव्ह मार्किंग म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 (25%) गुण वजा केले जातील.

टीप: उमेदवाराने ऑनलाइन परीक्षेतील प्रत्येक चाचणीत बँकेने निश्चित केलेले किमान पात्रता गुण (Minimum Qualifying Marks) मिळवणे आवश्यक आहे. तसेच संबंधित प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या Cut-off गुणांच्या आधारेच पुढील टप्प्यासाठी उमेदवारांची निवड केली जाईल.

3. ग्रुप डिस्कशन (Group Discussion)

काही पदांसाठी किंवा आवश्यकतेनुसार बँक Group Discussion (GD) किंवा Assessment Test आयोजित करू शकते. या टप्प्यात तुमचे संवाद कौशल्य, नेतृत्व क्षमता आणि बँकिंगविषयक ज्ञानाचे मूल्यांकन केले जाते.

4. वैयक्तिक मुलाखत (Personal Interview)

ऑनलाइन परीक्षा किंवा शॉर्टलिस्टिंगमध्ये जर तुम्ही पात्र ठरला तर वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत 100 गुणांची असेल.

  • General/EWS: किमान 50% गुण आवश्यक.
  • SC/ST/OBC/PwBD: किमान 45% गुण आवश्यक.

साधारणपणे उपलब्ध रिक्त पदांच्या 1:3 प्रमाणात उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

5. अंतिम निवड (Final Selection)

बँकेच्या निर्णयानुसार अंतिम गुणवत्ता यादी पुढीलपैकी कोणत्याही पद्धतीने तयार केली जाऊ शकते.

  • ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीतील एकत्रित गुणांच्या आधारे.
  • केवळ वैयक्तिक मुलाखतीतील गुणांच्या आधारे.
  • Group Discussion आणि मुलाखतीतील एकत्रित गुणांच्या आधारे.

दोन किंवा अधिक उमेदवारांचे गुण समान असल्यास वयाने मोठ्या उमेदवाराला गुणवत्ता यादीमध्ये प्राधान्य दिले जाईल.

6. कागदपत्र पडताळणी (Document Verification)

अंतिम निवडीपूर्वी तुमच्या सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यामध्ये शैक्षणिक प्रमाणपत्रे, वयाचा पुरावा, जातीचा दाखला, ओळखपत्र तसेच अनुभव प्रमाणपत्राचा समावेश असेल.

कामाच्या अनुभवासाठी केवळ अधिकृत स्वरूपातील Experience Certificate [(Annexure-II Format) जो तुम्ही अधिकृत PDF मध्ये बघू शकता] स्वीकारले जाईल. Joining Letter, Salary Slip किंवा इतर कागदपत्रे अनुभवाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाहीत.

7. वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

कागदपत्र पडताळणीनंतर तुमची वैद्यकीय तपासणी केली जाईल. बँकेने निर्धारित केलेल्या वैद्यकीय निकषांनुसार तुम्ही शारीरिक व मानसिकदृष्ट्या पात्र असल्यावरच अंतिम नियुक्ती दिली जाईल.

8. प्रोबेशन कालावधी आणि सेवा बंधन (Probation & Service Bond)

नियुक्तीनंतर तुम्हाला 2 वर्षांचा Probation Period पूर्ण करावा लागेल. तसेच तुम्ही किमान 3 वर्षे बँकेत सेवा देणे आवश्यक आहे. त्यापूर्वी नोकरी सोडल्यास सेवा बंधनानुसार दंड भरावा लागू शकतो.

  • Post G01 ते G19: ₹2,00,000 + लागू कर
  • Post S01 ते S108: ₹2,50,000 + लागू कर

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट आकाराचा फोटो (Colour Photo)
  • डिजिटल स्वाक्षरी (Signature)
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
  • स्वहस्ते लिहिलेले घोषणापत्र
  • १० वी व १२ वी चे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • पदवी / पदव्युत्तर पदवी गुणपत्रक व उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला (Cast Certificate) / EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • Non-Creamy Layer प्रमाणपत्र (OBC उमेदवारांसाठी)
  • आधार कार्ड / पॅन कार्ड / ओळखपत्र

अभ्यासक्रम (Syllabus)

ऑनलाइन परीक्षेचा अभ्यासक्रम संबंधित पदानुसार निश्चित करण्यात आला आहे. General Posts (G01 ते G19) आणि Specialist Officer Posts (S01 ते S108) यांचा परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा आहे. ह्या परीक्षेमध्ये जे विषय आहेत ते आपण बघूया:

इंग्रजी भाषा (English Language)

या विभागात तुमची इंग्रजी भाषेवरील पकड, व्याकरणाचे ज्ञान आणि आकलन क्षमता तपासली जाते. यामध्ये Reading Comprehension, Error Detection, Cloze Test, Fill in the Blanks, Para Jumbles, Synonyms, Antonyms तसेच Idioms and Phrases यांसारख्या विषयांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.

गणित (Quantitative Aptitude)

या विभागात तुमची गणिती क्षमता, वेग आणि अचूकता तपासली जाते. Data Interpretation, Number Series, Simplification, Quadratic Equations, Percentage, Profit & Loss, Ratio & Proportion, Average, Interest तसेच Time, Work & Distance या विषयांवर आधारित प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात.

बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning Ability)

या विभागामध्ये तुमच्या तार्किक विचारशक्तीची आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेची चाचणी घेतली जाते. Puzzles, Seating Arrangement, Syllogism, Coding-Decoding, Blood Relations, Direction Sense आणि Inequality यांसारख्या विषयांचा समावेश असू शकतो.

संबंधित पदाचे तांत्रिक ज्ञान (Professional Knowledge)

हा परीक्षेतील सर्वात महत्त्वाचा विषय असून, तुम्ही अर्ज केलेल्या पदानुसार प्रश्न विचारले जातात. IT पदांसाठी DBMS, Operating System, Networking, Cyber Security आणि Programming यांसारखे विषय, Finance आणि CA पदांसाठी Accounting, Taxation, Auditing व Financial Management, Risk Management पदांसाठी Credit Risk, Market Risk आणि Basel Guidelines, तर Law Officer पदांसाठी Banking Laws, SARFAESI Act, IBC आणि Negotiable Instruments Act यांसारख्या विषयांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.

महत्त्वाची सूचना: General Posts (G01 ते G19) साठी English Language, Quantitative Aptitude, Reasoning Ability आणि Professional Knowledge या विषयांचा समावेश असतो. तर Specialist Officer Posts (S01 ते S108) साठी केवळ संबंधित पदाच्या Professional Knowledge विषयावर आधारित ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. त्यामुळे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदानुसार अभ्यासक्रमाची माहिती अधिकृत अधिसूचनेतून एकदा तपासून घ्यावी.

(टीप: General Posts (G01 ते G19) साठी English Language, Quantitative Aptitude आणि Reasoning Ability हे विषय केवळ Qualifying स्वरूपाचे आहेत. अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना Professional Knowledge या विषयातील गुणांचा विचार केला जाईल.)

अर्ज कसा करावा? (How to Apply)

Step 1: नवीन नोंदणी (New Registration)

  • सर्वप्रथम युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि Careers / Recruitment विभागात जाऊन Apply Online या लिंकवर क्लिक करा.
  • Click Here for New Registration या पर्यायावर क्लिक करून नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाकून नोंदणी पूर्ण करा.
  • नोंदणी झाल्यानंतर Registration Number आणि Password तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर व ई-मेलवर पाठवण्यात येईल.

Step 2: अर्ज भरा (Fill Application Form)

Registration Number आणि Password वापरून लॉगिन करा. त्यानंतर वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक असल्यास कामाचा अनुभव काळजीपूर्वक भरा. सर्व माहिती भरल्यानंतर Preview पर्यायाद्वारे अर्जाची एकदा पडताळणी करून Save & Next वर क्लिक करा.

Step 3: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (Upload Documents)

  • अलीकडील पासपोर्ट साईझ फोटो
  • स्वाक्षरी (काळ्या शाईने)
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
  • इंग्रजीमधील हस्तलिखित घोषणापत्र (Handwritten Declaration)

टीप: स्वाक्षरी मोठ्या अक्षरांमध्ये (Capital Letters) केलेली असल्यास ती स्वीकारली जाणार नाही.

Step 4: अर्ज शुल्क भरा (Application Fee)

सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर प्रवर्गानुसार ऑनलाइन अर्ज शुल्क भरावे. शुल्क भरल्यानंतर अर्ज ‘Final Submit’ करून त्याची प्रिंट किंवा PDF सुरक्षित ठेवावी.

महत्त्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत PDFयेथे क्लिक करा

महत्त्वाच्या सूचना (Important Points)

  • ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना (Notification) काळजीपूर्वक वाचावी आणि संबंधित पदाची पात्रता तपासून घ्यावी.
  • अर्जामध्ये नमूद केलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सक्रिय ठेवावा. सर्व महत्त्वाच्या सूचना त्याच माध्यमातून पाठविल्या जातील.
  • अर्जामध्ये चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरल्यास उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. त्यामुळे अर्ज अंतिम सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती एकदा तपासून घ्यावी.
  • Age Limit मोजण्यासाठी 1 July 2026, तर शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक कामाचा अनुभव (Work Experience) निश्चित करण्यासाठी 10 August 2026 ही Cut-off तारीख लागू असेल.
  • अर्ज भरताना गुणांची टक्केवारी (Percentage) दशांशानंतर दोन अंकांपर्यंत अचूक नमूद करावी. CGPA किंवा SGPA असल्यास विद्यापीठाच्या नियमानुसार त्याचे Percentage मध्ये रूपांतर करून माहिती भरावी.
  • ज्या पदांसाठी अनुभव आवश्यक आहे, त्या पदांसाठी Full-time Work Experience असणे अनिवार्य आहे. Part-time किंवा Clerical Cadre मधील अनुभव संबंधित पदासाठी ग्राह्य धरला जाणार नाही.
  • अनुभवाचा पुरावा म्हणून Joining Letter, Salary Slip किंवा Salary Certificate स्वीकारले जाणार नाही. केवळ अधिकृत Experience Certificate (Annexure-II Format) सादर करणे आवश्यक आहे.
  • अनुभव प्रमाणपत्रामध्ये उमेदवाराचा कामाचा कालावधी (Duration), पद (Designation) आणि कामाचे स्वरूप (Nature of Duties) स्पष्ट नमूद केलेले असावे.
  • अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत ऑनलाइन अर्ज करावा, जेणेकरून तांत्रिक अडचणी टाळता येतील.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1: युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाइन अर्ज करण्याची तसेच अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) आहे.

2: शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि कामाचा अनुभव यासाठी Cut-off तारीख कोणती आहे?

शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक कामाचा अनुभव यासाठी 10 ऑगस्ट 2026 ही Cut-off तारीख निश्चित करण्यात आली आहे. तर उमेदवाराचे वय मोजण्यासाठी 1 जुलै 2026 ही तारीख ग्राह्य धरली जाईल.

3: अनुभवाचा पुरावा म्हणून Salary Slip किंवा Joining Letter स्वीकारले जाईल का?

नाही. अनुभवाचा पुरावा म्हणून Joining Letter, Salary Slip किंवा Salary Certificate स्वीकारले जाणार नाही. उमेदवाराने अधिकृत Experience Certificate (Annexure-II Format) सादर करणे आवश्यक आहे.

4: या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे?

या भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाइन (Online) पद्धतीने अधिकृत वेबसाइटद्वारे स्वीकारले जातील.

5: या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर नोकरीचे ठिकाण कुठे असेल?

या भरतीतील नियुक्ती भारतभर (All India) बँकेच्या आवश्यकतेनुसार विविध शाखा किंवा कार्यालयांमध्ये दिली जाऊ शकते.

6: ऑनलाइन परीक्षेत Negative Marking आहे का?

होय. ऑनलाइन परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 (25%) गुण वजा केले जातील. मात्र, एखादा प्रश्न सोडून दिल्यास त्यासाठी कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत.

निष्कर्ष (Conclusion)

युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) आणि मॅनेजर बनण्याची ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. जरी पात्रता आणि अनुभवाचे नियम कडक असले, तरी योग्य पात्रता असणाऱ्यांच्या करिअरला यामुळे मोठी गती मिळेल. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव आणि इतर अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचून निश्चित मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.

डिस्क्लेमर (Disclaimer)

या लेखामधील माहिती केवळ सामान्य माहितीसाठी (Informational Purposes) देण्यात आली आहे. माहिती अचूक ठेवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे. तरीही अर्ज करण्यापूर्वी युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत अधिसूचनेतील सर्व अटी, नियम आणि पात्रता निकष काळजीपूर्वक तपासावेत. अधिकृत अधिसूचनेतील माहिती अंतिम आणि ग्राह्य मानली जाईल.

अशाच नवीन नोकरीच्या भरती आणि करिअर अपडेट्ससाठी JobDukan वेबसाइटला नियमित भेट देत रहा.

Leave a Comment