CPCL Recruitment 2026: 60 पदांसाठी भरती, Apply Now

चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (CPCL) ने 2026 मध्ये Junior Engineering Assistant-IV पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे Production, Mechanical, Electrical आणि Instrumentation विभागातील एकूण 60 पदे भरली जाणार आहेत. संबंधित तांत्रिक डिप्लोमा पात्रता आणि 3 वर्षांचा आवश्यक पोस्ट-क्वालिफिकेशन कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी या सार्वजनिक क्षेत्रातील ‘नवरत्न’ कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.

(टीप: अधिकृत नियमांनुसार, महिला उमेदवार केवळ Mechanical, Electrical आणि Instrumentation पदांसाठीच पात्र आहेत. तसेच उच्च व्यावसायिक शिक्षण जसे की B.E./B.Tech घेतलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र नाहीत).

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचनेतील सर्व अटी काळजीपूर्वक तपासाव्यात.

मूलभूत माहिती

घटकमाहिती
भरती संस्था Chennai Petroleum Corporation Limited (CPCL)
भरतीचे नावCPCL Recruitment 2026
पदाचे नावJunior Engineering Assistant-IV
पदांचा प्रकारNon-Supervisory Cadre, Grade IV
एकूण जागा60
अर्ज पद्धतीOnline
अर्ज सुरू होण्याची तारीख14 ऑगस्ट 2026
अर्जाची अंतिम तारीख11 सप्टेंबर 2026
परीक्षाComputer Based Test (CBT)
परीक्षा केंद्रChennai
CBT संभाव्य कालावधीSeptember/October 2026
वेतनश्रेणी₹25000 – ₹1,05,000
अधिकृत वेबसाइटcpcl.co.in
CPCL Recruitment 2026 Junior Engineering Assistant-IV 60 vacancies

महत्त्वाच्या तारखा

  • अधिकृत अधिसूचना तारीख: 14 ऑगस्ट 2026
  • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 14 ऑगस्ट 2026
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 11 सप्टेंबर 2026
  • अर्ज शुल्क (Fee) भरण्याची अंतिम तारीख: 11 सप्टेंबर 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)
  • प्रवेशपत्र (Admit Card)CBT: परीक्षेच्या साधारण 10 दिवस आधी उपलब्ध होईल
  • संगणकीकृत परीक्षा (CBT) कालावधी: सप्टेंबर / ऑक्टोबर 2026 (संभाव्य)

CPCL च्या अधिकृत अधिसूचनेनुसार CBT परीक्षेची अचूक तारीख नंतर जाहीर केली जाईल. ही परीक्षा केवळ चेन्नई (तमिलनाडू) येथेच आयोजित केली जाणार आहे. या संदर्भातील माहिती तुमच्या नोंदणीकृत ईमेल (Registered Email) वर पाठवली जाईल आणि CPCL च्या अधिकृत Careers Page वर देखील अपडेट केली जाईल.

पदांचा तपशील

CPCL भरती 2026 मध्ये Junior Engineering Assistant-IV पदांच्या एकूण 60 जागा आहेत.

Post Codeपदाचे नावएकूण जागा
CPCL01Jr. Engg. Asstt-IV (Production)40
CPCL02Jr. Engg. Asstt-IV (Mechanical)10
CPCL03Jr. Engg. Asstt-IV (Electrical)05
CPCL04Jr. Engg. Asstt-IV (Instrumentation)05
एकूण60

शिफ्ट ड्युटी (Shift Arrangements):
अधिसूचनेनुसार निवड झालेल्या उमेदवारांना गरजेनुसार 1, 2 किंवा 3 शिफ्ट्समध्ये (रात्रीच्या शिफ्टसह) काम करावे लागेल.

महिला उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती (Mandatory Instructions for Women):
Factories Act, 1948 च्या नियमांनुसार आणि 24 तास चालणाऱ्या शिफ्ट ऑपरेशन्सच्या स्वरूपामुळे महिला उमेदवार ‘Production’ (CPCL01) या पदासाठी अर्ज करू शकत नाहीत. तसेच रात्री 7:00 ते सकाळी 6:00 या वेळेत काम कराव्या लागणाऱ्या विभागांमध्ये महिलांचा विचार केला जाणार नाही.

महिला उमेदवार केवळ खालील 3 पदांसाठीच अर्ज करण्यास पात्र आहेत:

  • Junior Engineering Assistant-IV (Mechanical)
  • Junior Engineering Assistant-IV (Electrical)
  • Junior Engineering Assistant-IV (Instrumentation)

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

सर्व डिप्लोमा/B.Sc. साठी किमान गुण: General/OBC/EWS: 60% | SC/PwBD: 55% गुण आवश्यक आहेत.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रताकिमान 3 वर्षांचा आवश्यक अनुभव (Experience)
ProductionChemical/Petroleum/Petrochemical चा 3 वर्षांचा डिप्लोमा किंवा
B.Sc. (Chemistry Major)
Refinery, Chemical, Petrochemical, Fertilizer किंवा Gas Processing इंडस्ट्रीमधील Continuous Process Units चा अनुभव.
MechanicalMechanical Engineering चा 3 वर्षांचा डिप्लोमाRefinery, Chemical, Power Plant किंवा मोठ्या इंडस्ट्रियल प्लांटमधील Maintenance कामाचा अनुभव.
ElectricalElectrical / Electrical & Electronics चा 3 वर्षांचा डिप्लोमाContinuous Process Industry मधील Electrical Equipment Maintenance चा अनुभव.
InstrumentationInstrumentation / Instrumentation & Control / Electronics & Communication चा 3 वर्षांचा डिप्लोमाProcess Control Instrumentation Maintenance चा अनुभव.

महत्त्वाची टीप (Higher Qualification): CPCL च्या notification नुसार B.E./B.Tech, MBA, CA, LLB, MCA किंवा अशा higher professional qualification असलेले उमेदवार पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी ही अट विशेषतः तपासावी.

वयोमर्यादा (Age Limit)

वयाची गणना 01 जुलै 2026 रोजी केली जाईल.

  • कमाल वय (Maximum Age): 30 वर्षे (General / EWS)
  • SC / ST उमेदवार: 35 वर्षे (5 वर्षांची सूट)
  • OBC (NCL) उमेदवार: 33 वर्षे (3 वर्षांची सूट)
  • PwBD उमेदवार: 10 ते 15 वर्षांपर्यंत सूट
  • Ex-Servicemen: नियमांनुसार सेवा कालावधी + 3 वर्षे (कमाल 50 वर्षांपर्यंत)

निवड प्रक्रिया (Selection Process)

CPCL Recruitment 2026 मधील अंतिम निवडीसाठी उमेदवारांना खालील टप्प्यांमधून जावे लागेल:

  • संगणकीकृत परीक्षा (Computer Based Test – CBT)
  • कागदपत्र पडताळणी (Document Verification)
  • कौशल्य, नैपुण्य आणि/किंवा शारीरिक चाचणी (SPPT)
  • वैद्यकीय तपासणी (Pre-Employment Medical Fitness)

1. CBT – Computer Based Test

ही परीक्षा एकूण 120 गुणांची आणि 120 प्रश्नांची असेल. तर उमेदवारांना पेपर सोडवण्यासाठी एकूण 2 तास (120 मिनिटे) वेळ दिला जाईल. तसेच गुण विभागणी (Section-wise Marks) खालीलप्रमाणे असेल.

  • General Aptitude (सामान्य क्षमता): या विभागामध्ये Verbal Ability, General Knowledge, Reasoning / Logical Deduction आणि Numerical Ability या विषयांवर आधारित 50 प्रश्न (50 गुणांसाठी) विचारले जातील.
  • Discipline Knowledge (तांत्रिक ज्ञान): या विभागामध्ये उमेदवाराच्या संबंधित इंजिनिअरिंग किंवा केमिस्ट्री विषयावर आधारित 70 प्रश्न (70 गुणांसाठी) विचारले जातील.

या परीक्षेत नकारात्मक गुण पद्धती लागू आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 (0.25) गुण वजा केले जातील.

2. Document Verification

CBT मध्ये आवश्यक गुण मिळवून पुढील टप्प्यासाठी shortlisted झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव, जात/आरक्षण आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

तुम्ही Document Verification च्या वेळी मूळ कागदपत्रे तसेच आवश्यक प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

3. Skill, Proficiency and/or Physical Test (SPPT)

CBT मधील गुणांच्या आधारे उमेदवारांना SPPT साठी shortlist केले जाईल. साधारणपणे एका पदासाठी तीन उमेदवारांच्या (1:3) प्रमाणात shortlist केले जाईल.

SPPT ही Qualifying Nature ची चाचणी आहे. म्हणजेच या चाचणीत उमेदवाराला पात्र ठरणे आवश्यक आहे; मात्र SPPT मध्ये मिळालेले गुण अंतिम गुणवत्ता यादीत जोडले जाणार नाहीत.

4. Pre-Employment Medical Fitness

SPPT मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची Pre-Employment Medical Fitness तपासणी केली जाईल. CPCL च्या वैद्यकीय मानकांनुसार उमेदवार medically fit असणे आवश्यक आहे.

5. अंतिम निवड (Final Selection)

अंतिम निवड CBT मधील गुणांच्या आधारे तयार होणाऱ्या merit आणि SPPT मध्ये पात्रता यावर आधारित केली जाईल. यासोबत तुम्ही Document Verification यशस्वीरीत्या पूर्ण करणे आणि Pre-Employment Medical Fitness मध्ये medically fit असणे आवश्यक आहे.

त्यामुळे निवड प्रक्रियेचा साधा क्रम असा आहे:
CBT => Shortlisting => Document Verification => SPPT (Qualifying) => Medical Fitness => Final Selection

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

  • जन्मतारखेचा पुरावा (उदा. 10 वीचे बोर्ड सर्टिफिकेट/शाळा सोडल्याचा दाखला) आणि फोटो आयडी प्रुफ (आधार कार्ड/पॅन कार्ड).
  • डिप्लोमा किंवा B.Sc. च्या सर्व वर्षांच्या गुणपत्रिका (Mark Sheets) आणि पदविका/पदवी प्रमाणपत्र (Degree/Diploma Certificate).
  • संबंधित उद्योगातील किमान 3 वर्षांचे Work Experience Certificate.
  • Caste Certificate / OBC-NCL / EWS उत्पन्न प्रमाणपत्र / PwBD दिव्यांग प्रमाणपत्र / माजी सैनिक (Ex-SM) संबंधित कागदपत्रे.
  • उमेदवार शासकीय किंवा PSU क्षेत्रात कार्यरत असल्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (No Objection Certificate).
  • पासपोर्ट फोटो: 20 KB ते 60 KB (Format: JPG / JPEG / PNG)
  • स्वाक्षरी (Signature): 10 KB ते 30 KB (Format: JPG / JPEG / PNG)

अभ्यासक्रम (Syllabus)

जनरल ॲप्टिट्यूड (General Aptitude – 50 प्रश्न)

  • Verbal Ability: इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रह.
  • Numerical Ability: मूलभूत गणितीय क्रिया आणि आकडेमोड.
  • Reasoning & Logical Deduction: तार्किक क्षमता आणि कोडी.
  • General Knowledge: चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान.

तांत्रिक ज्ञान (Discipline Knowledge – 70 प्रश्न)

या विभागातील प्रश्न डिप्लोमा स्तराचे (Diploma-level) असतील:

  • Production: Chemical, Petrochemical आणि Process-related संकल्पना.
  • Mechanical: Mechanical Equipment आणि Maintenance चे तांत्रिक ज्ञान.
  • Electrical: Motors, Transformers, Switchgear आणि Protection.
  • Instrumentation: Process Control, Field Instruments, DCS/PLC आणि P&ID Diagrams.

महत्त्वाची टीप: उमेदवारांनी आपल्या पदाशी संबंधित मूलभूत संकल्पना (Basic Concepts) आणि प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनवर आधारित प्रश्नांचा अधिक सराव करावा.

अर्ज कसा करावा? (How to Apply)

  • सर्वप्रथम CPCL च्या अधिकृत वेबसाइटवरील Careers Portal वर जा.
  • ‘New User Registration’ वर क्लिक करून तुमचे पद, नाव, ईमेल आणि मोबाईल नंबर भरा.
  • तुमच्या मोबाईल आणि ईमेलवर आलेला OTP टाकून नोंदणी प्रक्रिया (Registration) पूर्ण करा.
  • नोंदणीनंतर मिळालेला User ID आणि Password वापरून अर्ज पोर्टलवर लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर पालकांचे नाव, पत्ता आणि ओळखपत्राचा क्रमांक यासारखी वैयक्तिक माहिती भरा.
  • तुमच्या शैक्षणिक पात्रतेचे जसे की Diploma किंवा B.Sc. पदवीचे सर्व गुण आणि तपशील अचूक नोंदवा.
  • या भरतीसाठी अनुभव अनिवार्य असल्याने तुमच्या किमान 3 वर्षांच्या पोस्ट-क्वालिफिकेशन कामाचा तपशील भरा.
  • तुमचा अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो (20 ते 60 KB, JPG/JPEG फॉरमॅट) अपलोड करा.
  • तुमची स्कॅन केलेली स्वाक्षरी (10 ते 30 KB, JPG/JPEG फॉरमॅट) रकान्यात अपलोड करा.
  • तुमचे सर्व आवश्यक मूळ दस्तऐवज आणि प्रमाणपत्रे (PDF फॉरमॅट, 60 KB ते 2 MB) अपलोड करा.
  • अर्ज अंतिम सबमिट करण्यापूर्वी ‘Preview’ पर्यायावर क्लिक करून सर्व माहिती पुन्हा एकदा काळजीपूर्वक तपासा.
  • जनरल, EWS आणि OBC उमेदवारांनी 500rs अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा (SC, ST, PwBD, माजी सैनिक आणि महिलांना फी पूर्णपणे माफ आहे).
  • पेमेंट यशस्वी झाल्यानंतर अंतिम अर्ज (Application Form) आणि फी पावतीची प्रिंटआउट काढून स्वतःकडे सुरक्षित ठेवा.

महत्त्वाची टीप: तुम्ही फक्त एकाच पदासाठी अर्ज करता येईल, एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केल्यास फी परत (Refund) केली जाणार नाही.

महत्त्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत PDFयेथे क्लिक करा

महत्त्वाच्या सूचना (Important Points)

  • अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाची educational qualification आणि experience नीट तपासा.
  • चुकीची किंवा खोटी माहिती आढळल्यास candidature/appointment रद्द होऊ शकते.
  • Higher professional qualification असलेले उमेदवार पात्र नसल्याची अट notification मध्ये दिली आहे.
  • CBT September/October 2026 मध्ये Chennai येथे होण्याचे tentative schedule आहे.
  • CBT साठी Admit Card आणि notification मध्ये सांगितलेला Photo ID Proof सोबत घेऊन जावे लागेल.
  • Examination centre वर mobile phone, smartwatch किंवा इतर communication devices नेण्यास परवानगी नाही.
  • अंतिम नियुक्ती ही कंपनीच्या वैद्यकीय तपासणी (Medical Fitness) मंजुरीवर अवलंबून असेल.
  • तुम्हाला जर अर्ज भरताना काही अडचण येत असेल तर तुम्ही आवश्यक document घेऊन cyber cafe मध्ये भरू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1. CPCL भरती 2026 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाईन अर्ज आणि फी भरण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) आहे.

2. Junior Engineering Assistant-IV या पदांसाठी अनुभव आवश्यक आहे का?

होय, सर्व 4 विभागांतील पदांसाठी संबंधित क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा पोस्ट-क्वालिफिकेशन कामाचा अनुभव (Work Experience) असणे अनिवार्य आहे. ही भरती फ्रेशर्ससाठी नाही.

3. या भरतीसाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे आणि उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार पात्र आहेत का?

संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील 3 वर्षांचा डिप्लोमा किंवा B.Sc. (Chemistry) असणे आवश्यक आहे. B.E. / B.Tech, MBA, MCA सारख्या उच्च व्यावसायिक पदव्या असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र नाहीत.

4. परीक्षेचे स्वरूप कसे असेल आणि यात निगेटिव्ह मार्किंग आहे का?

परीक्षा एकूण 120 गुणांची (General Aptitude 50 गुण + Technical 70 गुण) संगणकीकृत चाचणी (CBT) असेल. यामध्ये नकारात्मक गुण पद्धती लागू असून, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 (0.25) गुण वजा केले जातील.

5. परीक्षा केंद्र कुठे असेल आणि यासाठी अर्ज शुल्क (Application Fee) किती आहे?

परीक्षा केवळ चेन्नई येथेच आयोजित केली जाईल. जनरल, EWS आणि OBC उमेदवारांसाठी फी 500rs आहे, तर SC, ST, PwBD, माजी सैनिक आणि सर्व महिला उमेदवारांना फी पूर्णपणे माफ आहे.

निष्कर्ष (Conclusion)

सार्वजनिक क्षेत्रातील एका नामांकित ‘नवरत्न’ कंपनीत करिअर घडवण्याची आणि सन्मानजनक वेतन मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. तुमच्याकडे आवश्यक तांत्रिक पात्रता आणि ३ वर्षांचा अनुभव असेल, तर ही संधी गमावू नका. शेवटच्या क्षणी होणारी सर्व्हरची गर्दी किंवा तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी वेळेतच तुमचा अर्ज अचूकपणे सादर करा आणि तुमच्या तयारीला सुरुवात करा. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

डिस्क्लेमर (Disclaimer)

या लेखामधील माहिती केवळ सामान्य माहितीसाठी (Informational Purposes) देण्यात आली आहे. माहिती अचूक ठेवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे. तरीही अर्ज करण्यापूर्वी IBPS च्या अधिकृत अधिसूचनेतील सर्व अटी, नियम आणि पात्रता निकष काळजीपूर्वक तपासावेत. अधिकृत अधिसूचनेतील माहिती अंतिम आणि ग्राह्य मानली जाईल.

अशाच नवीन नोकरीच्या भरती आणि करिअर अपडेट्ससाठी JobDukan वेबसाइटला नियमित भेट देत रहा.

Leave a Comment